निळावंती : पशु-पक्ष्यांना “ताब्यात” ठेवण्याची तांत्रिक शक्ती देणाऱ्या ग्रंथाचं अगम्य गूढ
निळावंती नावाचा ग्रॅंथ भास्करभट्ट या माणसाने १६०५-१६०९-१६२५ या सालात लिहला अस सांगतात. आत्ता यातलं नेमकं साल कोणतं तर सोळाशे हा आकडा धरून लोकं पुढची तारीख सांगतात. काही लोकं तो ग्रॅंथ भास्कराचार्यानी लिहला अस सांगतात. पण भास्कराचार्यानी लिलावती लिहला. तो गणितशास्त्राविषयी आहे. निळावंती नावाच वेगळं प्रकरण आहे.
या ग्रॅंथावर भारतात १९३५ सालापासून बंदी आणण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश शासनाने ती बंदी आणलेली. आत्ता बंदी नेमकी का आणली याचं ठोस कारण नसलं तरी अस सांगण्यात येत की याचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात येत असल्यानेच बंदी आणण्यात आली. विशेष म्हणजे निळावंती नावाशी संबधित जितक्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींवर सरकारने बंदी आणली अस सांगितलं जातं.
काय आहे या पुस्तकात ?
हे पुस्तक वाचल्यानंतर पशु पक्षांची भाषा समजते. हे पशु पक्षी तुम्हाला गुप्तधनाबद्दल माहिती देतात अशी दंतकथा आहे. बर हे पुस्तक सहज वाचलं तर चालत का तर नाही. आयुष्यात थिरर पाहीजे तर कष्ट पण उपसले पाहीजेत. म्हणजे कसं तर हे पुस्तक गरोदर बाई वारल्यानंतर तिला अग्नी दिलेला असतो त्याच प्रकाशात वाचावं अस सांगितलं जातं. तितक्या वेळात हा ग्रॅंथ वाचून पुर्ण केला तर तुम्हाला पशु पक्ष्याच्या सह ८४ लक्ष योनींची भाषा आत्मसात होते. अगदी भूत, प्रेत, पिशाच्च यांच्या भाषा देखील तुम्हाला समजू लागतात अस सांगतात.
कथा काय आहे ?
निळावंतीची कथा अशी आहे की,
तीला पशुपक्ष्यांच्या भाषा येत असतात. ती आपल्या माहेरी जात असताना तिला मंगुसाची जोडी दिसते. नर मुंगस आंधळा असल्याचं मादा मुंगूस निळावंतीला सांगते. त्यानंतर निळावंती लाल मणी मुंगसाच्या डोळ्याच्या ठिकाणी लावते. मंगुस हे उपकार विसरणाऱ्यातला नसतो. मादा निळावंतीला ऑफर देते की, मी तूला गुप्त खजिना दाखवते. डोक्यावर मणी असणाऱ्या एका सापाकडे तो खजिना असतो. निळावंती तो मिळवते.
इतक्यावर गप्प बसेल ती निळावंती कसली, तिला खजिन्याचा नाद लागतो. एका रात्री निळावंती घरात झोपलेली असते. बाहेर दूरवर कोल्हेकुई चालू असते. ती निट लक्ष देवून ऐकते तेव्हा कोल्हा म्हणत असतो की नदीतून एक प्रेत वहात येत आहे व त्याच्या कंबरेला सोन्यानाण्याची पिशवी आहे.निळावंती लगेच कामाला लागते. ती नदीवर जाते. तिथे प्रेत दिसतं. हाताने ती पिशवी काढू लागते पण पिशवी निघत नाही. मग ती तोंडाने ती पिशवी तोडू लागते. इतक्यात आपली बायको रात्रीची उठून कुठ गेली म्हणतं संशयी नवरा तिच्या मागे येतो. ते समोरचं दृश्य बघतो. आपली बायको प्रेत खात आहे असा त्याचा समज होतो. तो बायकोला सोडून देतो. त्यानंतर निळावंती निघून जाते. ती कुठे गेली हे सांगण्यात येत नाही.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा