घोटाण येथील मल्लिकार्जुन मंदिर



शेवगाव-पठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

 मल्लिकार्जुन मंदिर १३ व्या १४ व्या बांधलेले आहे व पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर त्याची दुरुस्ती केली गेली. मंदिराचा मंदिराच्या खालचा भाग दगडाने बांधलेले आहे, तर शिखर बांधकामात विटा आणि चुना वापरलेले आहे. खांबांचा

खालचा भाग आयताकृती आहेत, वरचा भागाचा आकार अष्टभुज, आयताकृतीत विभाजित करण्यात आल्या आहेत, त्याच्यावर लढणारे हत्तींच्या जोडी, घोडा वर बसलेले योद्धा, मकरमुख आणि घाटपल्लव यांचे आकृती कोरलेले आहेत.

घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना याठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’ अशी आख्यायिका सांगितली जाते. यादव कालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मुख्य मंदिर हे ६० फुट लांबी-रुंदीचे आहे. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्ल-युद्ध तसेच काही मिथुन शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात १६ पैकी जे चार खांब मधोमध आहेत त्यावर चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूंवर एकेक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Top 5 Horror Movies | सत्य घटनांवर आधारित हॉलिवूडचे चित्रपट