Top 5 Horror Movies | सत्य घटनांवर आधारित हॉलिवूडचे चित्रपट
📽: आज आम्ही तुमच्यासाठी हॉलिवूडचे असे अनेक चित्रपट घेऊन आलो, आहोत जे खऱ्या घटनांवर आधारित आहेत आणि ते पाहिल्यावर तुमच्या अंगावर देखील काटा येऊ शकतो.
अॅनाबेल कम्स होम
अॅनाबेल कम्स होम हा चित्रपट वास्तविक जीवनापासून प्रेरित होता. यानुसार 1970 मध्ये अमेरिकेतील एका आईने आपली मुलगी डोनासाठी दुकानातून एक बाहुली खरेदी केली. असे म्हटले जाते की, अॅनाबेल नावाच्या मुलीचा आत्मा बाहुलीच्या आत आला होता. सिनेमागृहात अॅनाबेल कम्स होम पाहत असताना एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. आता या ठिकाणावरून अंदाज लावा की, हा चित्रपट किती भयानक असेल.
द एक्झॉरिस्ट
या चित्रपटात एका मनुष्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे, ज्यात आत्मा आहे आणि त्याला वाचवण्यासाठी पुजारीचे प्रयत्न सुरु आहेत. चित्रपटातील अनेक दृश्ये खूप भीतीदायक होती. 1973 मध्ये रिलीज झालेला हा हॉलिवूड चित्रपट विल्यम फ्रिडकिनने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट विल्यम पीटर ब्लाट्टीच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता.
सायको
सायको हा भयपट चित्रपट मुख्यत्वे एड गेनच्या गुन्ह्यांवर आणि हत्यांनी प्रेरित आहे. या चित्रपटाचे अनेक भाग आहेत. जर तुम्हाला भयानक कथा आवडत असतील तर नक्कीच तुम्ही हे नक्कीच पाहू शकता.
सायलेंट हाऊस
सायलेंट हाऊस ही कथा उरुग्वेमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस केंटिस आणि लॉरा लाऊ या जोडीने केले होते. अभिनेत्री एलिझाबेथ ओल्सेनचा पहिला चित्रपट एका महिलेच्या अलौकिक शक्तींसह तिच्या घराच्या आत अडकलेल्या दुःखदायक अनुभवाची कथा सांगतो.
पॅरानार्मल अॅक्टिविटीज
ही एक तरुण जोडप्याची कथा होती ज्यांना त्यांच्या घरात पॅरानार्मल अॅक्टिविटीजचा अनुभव घेतात. त्यांचे घर सोडण्याऐवजी, जोडप्याने त्यांच्यासोबत घडलेल्या या घटना कॅमेऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये प्रदर्शित झालेला हा अमेरिकन अलौकिक भयपट चित्रपट ओरेन पेली यांनी दिग्दर्शित केला होता.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा