पोस्ट्स

दिव्या भारतीच्या मृत्यूचं न सुटलेलं कोडं

इमेज
  बॉलिवूडमध्ये १९९० च्या दशकामध्ये दिव्या भारती हिनं तिच्या सौंदर्यानं सर्वांना वेड लावलं होतं. तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या अभिनयाचेही अनेक जण चाहते होते. अल्पावधीतच दिव्या भारती हिला लोकप्रियता मिळाली होती. परंतु ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्या भारती हिचा अकस्मिक मृत्यू झाला आणि संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. अवघ्या १९ व्या वर्षी दिव्यानं या जगाचा निरोप घेतला. दिव्या भारती हिचा मृत्यू हे आजही एक कोडं आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिनं आत्महत्या केली का, की तिची हत्या करण्यात आली हे असे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ज्या दिवशी दिव्या भारतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी नवीन घर विकत घेतलं होतं. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, ती नक्कीच आत्महत्या करणार नाही. तर मग तिच्या मृत्यूमागे काही कट होता का की आणखी काही वेगळं कारण होतं. अनेक वर्षांपासून हे गूढ अद्याप सुटलेलं नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांनाही काही ठोस हाती लागलं नाही. त्यामुळे त्यांनी देखील १९९८ मध्ये ही केस बंद करून टाकली. Divya Bharti च्या आईनं सांगितलं मृत्यूमागचं धक्कादायक कारण हे देखील असू शकतं मृत्यूचं कारण दिव्या भार...

घोटाण येथील मल्लिकार्जुन मंदिर

इमेज
शेवगाव-पठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.   मल्लिकार्जुन मंदिर १३ व्या १४ व्या बांधलेले आहे व पेशवाईच्या काळात मोठ्या प्रमाणावर त्याची दुरुस्ती केली गेली. मंदिराचा मंदिराच्या खालचा भाग दगडाने बांधलेले आहे, तर शिखर बांधकामात विटा आणि चुना वापरलेले आहे. खांबांचा खालचा भाग आयताकृती आहेत, वरचा भागाचा आकार अष्टभुज, आयताकृतीत विभाजित करण्यात आल्या आहेत, त्याच्यावर लढणारे हत्तींच्या जोडी, घोडा वर बसलेले योद्धा, मकरमुख आणि घाटपल्लव यांचे आकृती कोरलेले आहेत. घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना याठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या...

Chicken Sukha Recipe In Marathi

इमेज
  500 ग्राम  चिकन 2  मोठे कांदे 1 वाटी  किसलेले खोबर 7-8  पाकळ्या लसूण 1 इंच  आले 2  मध्यम आकारचे टोमॅटो 1/2 वाटी  कोथिंबीर 1/2 वाटी  पुदिना 1 चमचा  बडीशेप 1/2 चमचा  हळद 2 चमचे  मिरची पावडर दिड चमचा  गरम मसाला 1 चमचा  धने पावडर चवी नुसार  मीठ 1 वाटी  दही स्टेप 1 कांदा उभा चिरून तेल घालून लाल भाजून घ्यावा. स्टेप 2 खोबरे मंद गॅसवर लालसर भाजून घ्यावे. स्टेप 3 टोमॅटो चिरून भाजून घ्यावा स्टेप 4 आलं, लसूण,टोमॅटो, कांदा, पुदिना, टोमॅटो, बडीशेप हे मिक्सरच्या भांड्यात घालून ओला मसाला करून घ्यावा. स्टेप 5 चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. स्टेप 6 एका भांड्यात, चिकन, तयार केलेला ओला मसाला, हळद, मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, धने पूड, दही घालून चिकनला नीट सर्व लावून घ्यावे. स्टेप 7 अर्धा तास मसाला चिकनमध्ये मुरण्यासाठी झाकून ठेवून द्यावे (वेळे असे तर तुम्ही आणखी वेळ ठेवू शकता) स्टेप 8 कढईत तेल गरम करून घ्यावे, त्यात थोडे जीरे घालून मुरवत ठेवलेले चिकन घालून तेलात चांगले परतावे. आणि पाणी न घालता, झाकण ठेवून शिजवुन घ्यावे.

ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता तुमच्या मोबाईलवर

इमेज
  नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे आता सर्व नागरिकांना Gram panchayat Certificates ग्राम पंचायतचे सर्व दाखले घरबसल्या मिळणार मिळणार आहे. मित्रांनो शासन maha e gram citizen connect app या आपच्या मदतीने ग्राम पंचायतीचे सर्व दाखले आपल्या मोबाइल मध्ये उपलब्ध करून देणार आहे. Gram panchayat Certificates बघा कोणकोणत्या सुविधा मिळतील या अॅपाच्या माध्यमातून गावकर्यांोना आणि त्याच बरोबर ग्राम पंचयात कर्मचार्यां ना खूप फायदा होणार आहे. ग्रामपंचायतीचे सर्व दाखले घरपोच मिळणार ग्रामपंचायत कार्यालयातून जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, मालमत्ते संबंधित दाखले, तसेच घरपट्टी, पानी पट्टी कर भराणा करायचा असल्यास आता तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-ई-ग्राम ॲप विकसित केले आहे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागतात. प्रत्येक वेळी आपली कागदपत्रे वेळवेवर मिळालेच याची खात्री नसते. त्यामुळे शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घाबसल्या अनेक सुविधा देण्यासाठी ही ऑप सुरू क...

Top 5 Horror Movies | सत्य घटनांवर आधारित हॉलिवूडचे चित्रपट

इमेज
📽:  आज आम्ही तुमच्यासाठी हॉलिवूडचे असे अनेक चित्रपट घेऊन आलो, आहोत जे खऱ्या घटनांवर आधारित आहेत आणि ते पाहिल्यावर तुमच्या अंगावर देखील काटा येऊ शकतो. अॅनाबेल कम्स होम अॅनाबेल कम्स होम हा चित्रपट वास्तविक जीवनापासून प्रेरित होता. यानुसार 1970 मध्ये अमेरिकेतील एका आईने आपली मुलगी डोनासाठी दुकानातून एक बाहुली खरेदी केली. असे म्हटले जाते की, अॅनाबेल नावाच्या मुलीचा आत्मा बाहुलीच्या आत आला होता. सिनेमागृहात अॅनाबेल कम्स होम पाहत असताना एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. आता या ठिकाणावरून अंदाज लावा की, हा चित्रपट किती भयानक असेल. द एक्झॉरिस्ट   या चित्रपटात एका मनुष्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे, ज्यात आत्मा आहे आणि त्याला वाचवण्यासाठी पुजारीचे प्रयत्न सुरु आहेत. चित्रपटातील अनेक दृश्ये खूप भीतीदायक होती. 1973 मध्ये रिलीज झालेला हा हॉलिवूड चित्रपट विल्यम फ्रिडकिनने दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट विल्यम पीटर ब्लाट्टीच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. सायको सायको हा भयपट चित्रपट मुख्यत्वे एड गेनच्या गुन्ह्यांवर आणि हत्यांनी प्रेरित आहे. या चित्रपटाचे अनेक भाग आह...

“सम्राट अशोक” – भारतीय इतिहासातील एक महान व उदार शासक 

इमेज
  मौर्य शासन संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू सम्राट अशोक ह्यांचा उल्लेख भारतीय इतिहासात केवळ महान राजा इतकाच नसून एक सर्वगुणसंपन्न, प्रजा हितकारी व भारतीय स्थापत्य कला विकसित करणारा राजा म्हणून होतो. सम्राट अशोकाची कीर्ती ही संपूर्ण भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ व मध्य आशिया खंडापर्यंत दूरवर पसरली होती. नंद शासकाला पदच्युत करून आचार्य चाणक्य ह्यांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनविले. व इथूनच मौर्य शासनाचे पाटलीपुत्र येथे अधिराज्य निर्माण झाले, सम्राट अशोक ह्यांच्या काळात पाटलीपुत्र साम्राज्याचा विस्तार उत्तरेस हिंदुकुश पर्वत श्रेणी पासून दक्षिणेस गोदावरी नदीला व्यापून कर्नाटकातील म्हैसूर पर्यंत पसरले होते. ह्याव्यतिरिक्त पूर्वेस बंगाल प्रांतापासून पच्छिमेस अफगाणिस्तान पर्यंत दूरवर साम्राज्याचा विस्तार होता, सम्राट अशोकची कारकीर्द पाहता तत्कालीन इतिहासात पाटलीपुत्र हे इत्यादी कारणांनी क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकछत्री राज्य होते. सम्राट अशोक यांचा इतिहास:सम्राट अशोक हे बिंदुसार ह्यांचे पुत्र व चंद्रगुप्त मौर्य ह्यांचे नातू होते. अशोकला इतरही सावत्र भाऊ होते ज्यामध्ये सुशीम, तिष्...

New Online Pan Card: आता घरबसल्या पॅनकार्ड काढा तुमच्या मोबाइल वर, अशाप्रकारे भरा फॉर्म

इमेज
  पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. पॅनकार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला NSDL  (National Securities Depository)  संकेतस्थळावर जावे लागेल, या साइटवरून तुम्ही पॅनकार्डसाठी ऑनलाईनअर्ज करू शकता, त्यासाठी खाली दिलेल्या Steps वापरा. Step-1 :  NSDL च्या वेबसाइटला भेट द्या पॅन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला  अधिकृत वेबसाइट  वर NSDL च्या या संकेतस्थळावर  जावे लागेल. या साइटवर गेल्यानंतर, “ऑनलाइन अर्ज करा” (“ Apply Online ”) निवडा Step 2: तपशील निवडा (Select Details) अर्जाचा प्रकार  – नवीन पॅन  New PAN – “Indian Citizen (Form 49A)” निवडा – त्यामध्ये आपण परदेशात रहात असाल तर “Foreign Citizen (Form  49AA)”  निवडा. Category –  आपल्या कार्डासाठी आपल्याला आवश्यक असलेली Category निवडायची आहे. तुम्हाला वैयक्तिक पॅनकार्ड काढायचे असेल तर  येथे “Individual” निवडा. अर्जाची माहिती  – यानंतर Personal Details  तपशील जसे की नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर इत्यादी भरा, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि Submit क्लिक करा. S...

आनंदीबाई गोपाळराव जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

इमेज
  आनंदीबाई गोपाळराव जोशी  ( ३१ मार्च ,  १८६५ : कल्याण , -  २६ फेब्रुवारी ,  १८८७ : पुणे ) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या. जन्म ३१ मार्च ,  १८६५ कल्याण  ,  महाराष्ट्र मृत्यू २६ फेब्रुवारी ,  १८८७  (वय २१) पुणे मृत्यूचे कारण क्षयरोग राष्ट्रीयत्व भारतीय नागरिकत्व भारतीय शिक्षण एम.डी. प्रशिक्षणसंस्था विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया पेशा वैद्यकीय ख्याती भारतातील पहिल्या महिला डॉक्टर धर्म हिंदू जोडीदार गोपाळराव जोशी स्वाक्षरी आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च, १८६५ रोजी  पुण्यात  त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या  कल्याण  परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. [३] [४]  वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे  अहमदनगर जिल्ह्यातील   संगमनेर  येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपा...