दिव्या भारतीच्या मृत्यूचं न सुटलेलं कोडं
बॉलिवूडमध्ये १९९० च्या दशकामध्ये दिव्या भारती हिनं तिच्या सौंदर्यानं सर्वांना वेड लावलं होतं. तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या अभिनयाचेही अनेक जण चाहते होते. अल्पावधीतच दिव्या भारती हिला लोकप्रियता मिळाली होती. परंतु ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्या भारती हिचा अकस्मिक मृत्यू झाला आणि संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली. अवघ्या १९ व्या वर्षी दिव्यानं या जगाचा निरोप घेतला. दिव्या भारती हिचा मृत्यू हे आजही एक कोडं आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिनं आत्महत्या केली का, की तिची हत्या करण्यात आली हे असे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ज्या दिवशी दिव्या भारतीचा मृत्यू झाला त्याच दिवशी नवीन घर विकत घेतलं होतं. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की, ती नक्कीच आत्महत्या करणार नाही. तर मग तिच्या मृत्यूमागे काही कट होता का की आणखी काही वेगळं कारण होतं. अनेक वर्षांपासून हे गूढ अद्याप सुटलेलं नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांनाही काही ठोस हाती लागलं नाही. त्यामुळे त्यांनी देखील १९९८ मध्ये ही केस बंद करून टाकली. Divya Bharti च्या आईनं सांगितलं मृत्यूमागचं धक्कादायक कारण हे देखील असू शकतं मृत्यूचं कारण दिव्या भार...